Anuradha Vipat
पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच असतो पण पावसात भिजल्यानंतर काही गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे.
पावसात भिजल्यानंतर सर्वप्रथम ओले कपडे काढून कोरडे आणि स्वच्छ कपडे परिधान करा.
टॉवेलने केस, हात, पाय आणि शरीर नीट पुसून घ्या. पायांच्या बोटांमधील ओलावा काढणे महत्त्वाचे आहे.
भिजल्यानंतर कोमट पाणी, हर्बल चहा किंवा गरम सूप घेतल्यास शरीराला उब मिळते आणि घशाला आराम मिळू शकतो.
ओले केस जास्त वेळ तसेच ठेवल्यास डोकेदुखी, सर्दी किंवा टाळूच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
पावसाच्या पाण्यात विविध प्रकारचे जंतू आणि घाण असू शकते. घरी आल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा.
शक्य असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि थंडी वाजण्याची शक्यता कमी होते.