Mahesh Gaikwad
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या होतात. निरोगी आरोग्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास फायदा होईल.
सकाळच्या नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये यामध्ये हरभरा, मटकी, मूग यांचा समावेश करा.
डाळी घालून केलेला पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
सकाळच्या नाश्त्यामध्ये एक किंवा दोन उकडलेली अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
निरोगी आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे हा सुध्दा उत्तम पर्याय आहे. तसेच केळी आणि मिल्क शेकचेही सेवन करू शकता.