Mahesh Gaikwad
कोरफड ही कमी पाण्याच्या प्रदेशातही उगवून येणारी औषधी वनस्पती आहे. कोरफड अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. यातील पोषक घटक आरोग्यासाठी खूपच उपयोगी असतात.
कोरफडीमध्ये फायबर, सोडियम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, झिंक, व्हिटामिन आणि बीटा केरोटीन असे अनेक घटक असतात.
जर तुम्ही एक महिना कोरफडीच्या गराचा ज्यूस घेतल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होईल? याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.
कोरफडीचा ज्यूस कोलेजन वाढविण्यास मदत करतो. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेच्या सुरकुत्या कमी होतात. तसेच कोरफड अँटी-एजिंग घटक म्हणूनही काम करते.
कोरफडीच्या ज्यूसमध्ये असणाऱ्या एन्झाइम्समुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.
कोरफडीमध्ये नैसर्गिकत: डिटॉक्स गुणधर्म असतात, जे तुमचे यकृत साफ करण्यास मदत करण्यासह संपूर्ण शरीरही डिटॉक्स करतात.
कोरफडीच्या ज्यूस नियमित घेतल्यास चयापचयाची क्रिया वाढते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते. परिणामी वजनही कमी होते.
नियमित कोरफडीचा ज्यूस घेतल्याने चेहऱ्यावरी मुरूम, काळे डाग कमी होवून त्वचा चमकदार होते. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.