Gladiolus Cultivation : ग्लॅडिओलस लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

Team Agrowon

लागवडीचा हंगाम

कडक उन्हाळा आणि सततचा जोरदार पाऊस हा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलसची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख मानले जातात.

Gladiolus Cultivation | Agrowon

तापमान

सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्‍वरसारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पीक चांगले येते. या कालावधीत फुलांचा तुटवडा असल्याने बाजारभाव देखील चांगले मिळतात.

Gladiolus Cultivation | Agrowon

बाजारभाव

वर्षभरातील बाजारभाव व फुलांची मागणी यांचा विचार करून संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड न करता १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने केल्यास फुलांना चांगला बाजारभाव मिळू शकतो.

Gladiolus Cultivation | Agrowon

जमिनीची निवड

मध्यम ते भारी प्रतीची, परंतु पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.

Gladiolus Cultivation | Agrowon

कंदाची निवड

किफायतशीर उत्पादनासाठी योग्य जातीची निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदाची निवड करावी. लागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवावेत. लागवडीसाठी ४ सेंमी किंवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत.

Gladiolus Cultivation | Agrowon

गादी वाफा

सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करताना दोन ओळींत ३० सेंमी व दोन कंदांत १५ ते २० सेंमी अंतर ठेवावे.

Gladiolus Cultivation | Agrowon

लागवडीचे अंतर

फुलदांडे सरळ येण्यासाठी आणि फुले येऊन गेल्यावर कंदांचे योग्य पोषण होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने लागवड करताना दोन सरींत ४० ते ४५ सेंमी व दोन कंदांत १० ते १५ सेंमी अंतर ठेवावे.

Gladiolus Cultivation | Agrowon
Strawberry | Agrowon