Mahesh Gaikwad
आजकाल वजन वाढण्याची जशी समस्या आहे, तशीच वजन कमी असण्याचीही समस्या अनेकांमध्ये दिसून येते.
शरीराला हेल्दी आणि फीट ठेवण्यासाठी व्यवस्थित आहार आवश्यक आहे. त्यामुळे कमी वजन असणाऱ्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
आज आपण वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये कोणकोणत्या पोषणयुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे, याची माहिती घेणार आहोत.
वजन वाढविण्यासाठी रोज १-२ केळी खावीत. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
दुधामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅटसह अनेक पोषक घटक असतात. दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिल्याने शरीर निरोगी राहते आणि वजनही वाढते.
सुका मेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स वजन वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत. काजू, बदाम यासारखे ड्रायफ्रूट्स दुधातून घेतल्यास फरक जाणवेल.
तूप वजन वाढविणाऱ्या आहारामध्ये खूपच लाभदायक आहे. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.