Mahesh Gaikwad
पावसाळ्याचा सिझन आला की, सर्दी खोकल्यासारख्या आजारांना हमखास आमंत्रण मिळते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने पावसाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण खूप असते.
त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश असणे आवश्यक आहे.
आज आपण पावसाळ्यात दालचीनीचा चहा प्यायल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.
दालचीनीचा चहा बनविण्यासाठी एका पातेल्यात एक ते दोन कप पाणी घेवून ते चांगले उकळून घ्या.
त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा दालचीनीची पावडर घाला किंवा दालचीनीची साल घाला. चहाची चव वाढविण्यासाठी आणि हेल्दी होण्यासाठी यामध्ये साखरेऐवजी मध घाला.
याशिवाय तुम्हाला आवडत असेल, तर यामध्ये आले, लवंग किंवा इलायची यासारखे मसाले घालू शकता.
पावसाळ्यात हा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच दालचीनीचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यासाठीही मदत होते.
त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दुधाऐवजी दालचीनी घातलेला चहा प्यायल्यास आरोग्यासाठी उत्तम आहे.