Animal Care : जनावरांसाठी मुक्त संचार गोठा कसा असावा?

Team Agrowon

मुक्त संचार पद्धतीत गोठा उभारणीसाठी बांधकामाच्या साहित्याची गरज ही न्यूनत्तम असते. त्यामुळे मुक्त संचार गोठा पद्धतीने कमी भांडवलात दुग्ध व्यवसायाची सुरुवात करणे शक्य होते.

Animal Care | Agrowon

या उलट बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये गोठा उभारणीसाठी चार ते पाच पट अधिक भांडवलाची आवश्यकता असते. या पद्धतीत दूध काढण्या व्यतिरिक्त इतर सर्व वेळ जनावरे मोकळी ठेवता येतात.

Animal Care | Agrowon

जनावरांना मुक्त संचार करता येत असल्यामुळे त्यांच्यावर येणारा ताण ही कमी होतो. या सर्व बाबी लक्षात घेता मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यास दुग्ध व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो.

Animal Care | Agrowon

मुक्त संचार गोठ्यात दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी एक मोकळी जागा निवडून तिला चारही बाजूंनी बांबूची किंवा लोखंडाचे मजबूत कुंपण करावे लागते.

Animal Care | Agrowon

निवडलेल्या जागी पाण्याच्या निचऱ्याची समस्या असल्यास गोठ्याची तळाची भूमी दगडी व मुरूम टाकून भरून घ्यावी.

Animal Care | Agrowon

कुंपणाच्या एकाकडेला जनावरांसाठी शेड बांधावे. जेणेकरून ऊन पावसाच्या कालावधीत जनावरांना आडोसा मिळेल. त्या शेडमध्ये खाद्य व पाण्याची व्यवस्था असावी.

Animal Care | Agrowon

मुक्त संचार गोठ्यातील वातावरणामध्ये वासरांची वाढ झपाट्याने होते. तसेच उत्पादन क्षमता वाढीस मदत होते.

Animal Care | Agrowon
आणखी पाहा...