sandeep Shirguppe
रोज रात्री एक मुठभर चणे भिजत ठेवून सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चणे खाल्ल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
चणे खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढतं. तसेच अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. त्यामुळे आज चणे खाण्याचे ५ फायदे आहेत.
चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला कॅल्शिअम, व्हिटॅमीन मिळते. चण्यांमध्ये लोह सुद्धा असते.
सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तुम्ही चणे खाणे आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे.
नॉनव्हेज न खाणाऱ्या व्यक्तींना हिमोग्लोबीनच्या समस्या जास्त असतात. त्यामुळे अशा व्यक्ती मुठभर चणे खाऊ शकतात.
शूगरच्या समस्यांवर मात करण्यासाठी चणे जास्त उपयुक्त आहेत. तसेच ब्लॉकेजच्या समस्या असलेल्या रुग्णांना याचे फायदे आहेत.
त्वचा आणि केसांसाठी देखील चणे उपयुक्त आहेत. चणे खाल्ल्याने आपल्या स्किनवर ग्लो येतो.
काळे चणे आणि गूळ खाल्ल्याने महिलांना मासीक पाळी दरम्यान त्रास कमी होतो.