Team Agrowon
पपई पिकाला सरासरी २२ ते २६ अंश सेल्सिअस तापमान मानवत. पण सध्या तापमानाचा पारा ४० च्या वर गेलाय त्यामुळे पपई ची पानं करपण, फळावर चट्टे पडण, फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळत आहेत.
पपई झाडाची मुळे मांसल असल्यामुळे जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो. त्यामुळे मुळे खराब होतात.
मुळांच अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करण्याचे कार्य मंदावत.फळांचा आकार लहान राहतो आणि फळाच्या गरामध्ये साका तयार होतो. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
वाढलेल्या तापमानामुळे पपई झाडावर पांढरी माशी, तुडतुडे या रसशोषक किडी आणि काही विषाणूजन्य रोगही पडतात. त्यामुळे पानांचा रंग हिरवट पिवळसर होतो.
पानांवर सुरकुत्या पडतात. जास्त प्रादुर्भावामध्ये फळावर पिवळे चट्टे पडतात. त्यामुळे फळांची प्रत खालावते.
नवीन लागवड केलेल्या झाडांना गोणपाट किंवा जुन्या साड्या लावून सावली करावी. सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा पंपाने करावे.
पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानांवर १ ते १.५ टक्के पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी. अशा प्रकारचे साधे उपाय करुन पपई बाग कडक उन्हापासून वाचवता येते.