Drip Irrigation : ठिबक संच निवडताना कोणती काळजी घ्यावी?

Team Agrowon

ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता येतो. ठिबक सिंचनामधून पाणी तसेच पाण्यात विरघळणारी रासायनिक खते ही पिकांच्या अवस्थेनुसार दिली जातात.

Drip Irrigation | Agrowon

ठिबक सिंचन संचाची उभारणी करताना जमिनीच्या प्रकारानुसार दोन इनलाइनमधील अंतर ४.५ फूट किंवा ५ फूट ठेवावे.

Drip Irrigation | Agrowon

ठिबक सिंचन निवड करताना आपल्याकडील जमीन कशी आहे? पाण्याचा स्रोत काय आहे? पाण्याची गुणवत्ता कशी आहे? त्यानुसार फिल्टरची निवड करावी.

Drip Irrigation | Agrowon

जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरलमधील आणि दोन ड्रीपर्समधील अंतर आणि ड्रीपर्सचा प्रवाह निवडावा.

Drip Irrigation | Agrowon

आपल्याकडील जमिनीनुसार ठिबक सिंचन संच निवडताना दोन झाडांमधील अंतर, ड्रीपर्समधील अंतर, ड्रीपर्सचा प्रवाह याची निवड केल्यास हा ठिबक सिंचन संच शंभरहून अधिक पिकासाठी वापरणे शक्य आहे. 

Drip Irrigation | Agrowon

जवळच्या अंतराच्या पिकासाठी ठिबक सिंचनाची निवड करताना इनलाइन ठिबक लॅटरलची निवड करावी.

Drip Irrigation | Agrowon

पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. रासायनिक खते ठिबकमधून देण्यासाठी व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक बसवावा. 

Drip Irrigation | Agrowon