Grape Prunning : द्राक्ष बागेत खरड छाटणी करताना कोणती काळजी घ्याल?

Team Agrowon

फळ काढणी झाल्यानंतर द्राक्ष बागेत वेलीला काही काळ विश्रांती देऊन पुन्हा खरड छाटणी घेतली जाते.

Grape Prunning | Agrowon

प्रत्येक भागात या कालावधीत खरड छाटणी करण्याचे काम सुरू होईल. मात्र वातावरणातील जास्त तापमानाचे काही विपरीत परिणाम वेलीवर दिसून दोन महत्त्वाच्या अडचणी दिसून येतात.

Grape Prunning | Agrowon

खरड छाटणीनंतर डोळे एकसारखे व लवकर फुटणे अतिशय महत्त्वाचे असते. या प्रक्रियेमध्ये बागेतील तापमान व आर्द्रता महत्त्वाची जबाबदारी निभावते.

Grape Prunning | Agrowon

खरड छाटणीवेळी काड्यांची जाडी कमी जास्त असू शकते. त्यानुसार त्यावरील डोळ्यांची जाडीसुद्धा लहानमोठी असू शकते. त्याचा परिणाम डोळे मागे पुढे फुटण्यामध्ये होतो.

Grape Prunning | Agrowon

काडीवरील डोळे एकसारखे फुटण्याकरिता ओलांड्यावरील प्रत्येक काडीची जाडी एकसारखी असणे गरजेचे असते.

Grape Prunning | Agrowon

खरड छाटणीनंतर ७ ते ८ पानांच्या अवस्थेत फुटींची विरळणी व्यवस्थित झालेली असल्यास या वेळी थोडा उशीर लागला तरी फुटी एकसारख्या निघतील.

Grape Prunning | Agrowon

डोळे लवकर व एकसारखे फुटण्याकरिता वेलींचे खोड व ओलांडा रसरशीत असणे गरजेचे असते. त्यासाठी खरड छाटणीच्या ३ ते ४ दिवसांपूर्वी बोदामध्ये भरपूर पाणी दिले पाहिजे. त्यामुळे ओलांड्याचा रसरशीतपणा वाढेल, परिणामी, लवकर डोळे फुटतील.

Grape Prunning | Agrowon