Animal Care : जनावरांतील कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?

Team Agrowon

पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांची माजाची लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचं आहे. एक माज चुकल्यास पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

Animal Care | Agrowon

गायी म्हशींनी दाखवलेला माज योग्य वेळी ओळखून रेतन केल्यास जनावर गाभण राहिल्यावर, गायीमध्ये किमान २७० ते २८० दिवसांत तर, म्हशीमध्ये ३०५ ते ३१० दिवसांत विण्याची प्रक्रिया झाली पाहिजे.

Animal Care | Agrowon

व्यायल्यानंतर पुढील किमान ५० ते ६० दिवसांत गायी, म्हशींनी पुन्हा माज दाखविला पाहिजे. अशा प्रकारे चक्र चालल्यास दुग्ध व्यवसायात निश्चितपणे फायदा होतो.

Animal Care | Agrowon

गायीला किंवा म्हशीला भरविल्यानंतर बाहेर टाकल्या जाणाऱ्या सोटाचे निरीक्षण महत्त्वाचे आस्ते. सोट चिकट, पारदर्शक असल्यास जनावर गाभण असल्याचे समजले जाते.

Animal Care | Agrowon

सोटामध्ये इतर कोणते घटक किंवा बदल दिसत असल्यास योग्य वेळी पशुवैद्यकाला दाखवून घ्यावे.

Animal Care | Agrowon

जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये वारंवार उलटण्याची समस्या दिसून येते.

Animal Care | Agrowon

काहीवेळेस मुका माज, जनावर माजावर न येणे यांसारख्या अडचणी दिसून येतात. वर्षाला एक वासरू मिळण्यासाठी आपल्या गोठ्यातील जनावरांची प्रजजन संस्था निरोगी, कार्यक्षम असणे गरजेचं आहे.

Animal Care | Agrowon

Nursery Development Scheme : २ लाख ७७ हजार रूपयांचं अनुदान मिळवायचंय? मग 'ही' रोपवाटीका विकास योजना घ्याच

आणखी पाहा...