Aslam Abdul Shanedivan
राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून विकासाच्या अनेक योजना राबवल्या जातात. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शासनाकडून रोपवाटीका योजना सुरु करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना असे योजनेचे नाव आहे.
या योजनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याबरोबरच दर्जेदार भाजीपाला आणि कीडरोग मुक्त रोपं तयार करणेचा आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजनेतून शेतकऱ्यांना तब्बल २ लाख ७७ हजारांचे अनुदान दिलं जाते.
दर्जेदार आणि कीडमुक्त शेतमाल निर्मितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका विकास योजना फायदेशीर ठरत आहे.
योजनेद्वारे शेडनेट, पॉलीटनेल, पावर नॅपसॅक स्प्रेयर आणि प्लास्टिक क्रेटस साठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते
या योजनेचा लाभ एक एकर म्हणजेच ०.४० हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येतो. तर महिला कृषी पदवीधारक, महिला गट, शेतकरी गटांना यांना प्राधान्य दिले जाते. यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in येथे अर्ज करावा लागतो.