Fertilizer Management : अन्नद्रव्यांचा योग्य वापर होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?

Team Agrowon

पिकास एकूण १७ अन्नद्रव्यांची गरज असते. या सर्व अन्नद्रव्यांचे संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.

Fertilizer Management | Agrowon

निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा व त्यांचे प्रमाण हे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच इतर घटकांचा शोषणावर काय परिणाम होतो, हे पाहणे ही महत्त्वाचे असते.

Fertilizer Management | Agrowon

शोषणाचा वेग, मुळांनी अन्नद्रव्य शोषण केल्यावर मुळाकडून पानापर्यंत होणारी अन्नद्रव्याची गतिमानता आणि गरज असलेल्या भागात पोहोचल्यावर तेथे होणारे कार्य या सगळ्या गोष्टी अन्नद्रव्ये शोषणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.

Fertilizer Management | Agrowon

प्रत्येक क्रियांवर अन्नद्रव्यांचा एकमेकांतील परस्परक्रियांचा परिणाम होत असतो. या परस्परक्रिया निरनिराळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जशा होतात, तशाच त्या मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्यातही होतात. या प्रक्रिया जमिनीत होतात, तशाच पिकातही होतात.

Fertilizer Management | Agrowon

अन्नद्रव्यातील परस्परक्रिया याचा स्थूलमानाने अर्थ होतो, की पिकांच्या अन्नद्रव्य शोषणाच्या दृष्टीने एका अन्नद्रव्याचा दुसऱ्या अन्नद्रव्यांवर होणारा अनुकूल किंवा अनिष्ट परिणाम होतो.

Fertilizer Management | Agrowon

एका अन्नद्रव्याबरोबर दुसरे अन्नद्रव्ये निरनिराळ्या प्रमाणात एकाच वेळी वापरलेले असतात, पिकांकडून मिळणारा प्रतिसाद भिन्न-भिन्न असतो.

Fertilizer Management | Agrowon

दोन अन्नद्रव्ये एकाच वेळी वापरली असता पिकाकडून मिळणारा प्रतिसाद वाढू शकतो किंवा त्यात खूप घट येऊ शकते.

Fertilizer Management | Agrowon