Mahesh Gaikwad
देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने गायी, म्हशी, शेळी , मेंढी या जनांवरांचे संगोपन पशुपालक करतात.
या पारंपरिक पशुपालनाच्या व्यवसायमध्ये आता वारहपालनाचाही समावेश झाला आहे. अनेकजण व्यवसाय म्हणून वराहपालनाकडे वळाल्याचे दिसते.
तुम्हालाही वराहपालनाचा व्यवसाय करायचा असेल, तर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
वराहपालना सुरू करताना डुकरांना ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
डुकरांना ठेवण्यासाठी शेडसह जागेसह त्याठिकाणी डुकारांना शरीर थंड ठेवण्यासाठी चिखल आणि पाण्याची डबक्याची व्यवस्था असावी.
याशिवाय डुकरांना ठेवण्यासाठी केलेले शेड तीन बाजूंनी बंदिस्त असले पाहिजे. तसेच डुकरांसाठी स्वच्छ आणि पुरेशा पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
वराहपालन ज्या ठिकाणी करत आहात, तेथील परिसर शांत आणि आवाजमुक्त असावा. यासाठी शहराऐवजी ग्रामीण भागातील जागेची निवड करावी.
डुकरांना योग्य आहार मिळेल याची काळजी घ्यावी. आहारामध्ये डुकरांना ज्वारी, गव्हाचा कोंडा तसेच पशुखाद्याचा समावेश असावा.