sandeep Shirguppe
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खाणे फायद्याचे ठरते. त्यासाठी सकाळच्या वेळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खावा.
पेरूची पाने तोंडामध्ये ठेवून चावल्यास दुर्गंध वास कमी होण्यास मदत होते.
नियमीत पेरूचे सेवन केल्यास पोटॅशिअम आणि तंतूच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीनी पेरू खाल्ला, तर मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते.
दुपारी जेवणानंतर पेरू खाल्ल्यास टॅनिन आम्ल या घटकांमुळे खालेले अन्न सहजरित्या पचण्यास मदत होते.
पेरूच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट सोबत इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे शरीरास फायदेशीर असतात.
गर्भवती स्त्रियांना उलटी, मळमळ असा त्रास होतो. त्यासाठी पेरूचा सरबत थोड्याथोड्या अंतराने पिण्यास द्यावा.
पेरूमध्ये ८० टक्के पाणी असते. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासही मदत करते.