Anuradha Vipat
गणपती हा बुद्धीचा देव असून अडथळे दूर करणारा, कला आणि विज्ञानाचा संरक्षक आहे
गणपतीच्या हातात अंकुश, पाश, परशु, आणि मोदक या वस्तू असतात.
अंकुश म्हणजे नियंत्रणाचे आणि बुद्धीचे प्रतीक आहे.
पाश कर्माचे फळ आणि भक्तांना योग्य मार्गावर नेणे याचं प्रतिक आहे
परशु म्हणजे कुऱ्हाड. हे वाईट विचारांचा नाश करण्याचे प्रतीक आहे.
मोदक यश, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे.
अनेक गणपतींच्या हातात वरदमुद्रा असते ज्यात हात वर करून आशीर्वाद दिला जातो.