Vermicompost Making: गांडूळखत बनवताना टाळा या चुका, मिळवा भरघोस उत्पादन

Swarali Pawar

चांगलं खत हवंय?

गांडूळखत बनवताना छोट्या चुका देखील मोठं नुकसान करू शकतात. योग्य पद्धतीने केल्यास खताची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढते.

Vermicompost Mistakes | Agrowon

योग्य गांडूळ निवडा

गांडूळखतासाठी आयसेनिया फोएटिडा ही जात उत्तम मानली जाते. ही जात जलद वाढते आणि वरच्या थरात राहून अन्न खाते.

Vermicompost Mistakes | Agrowon

जागा आणि तापमान महत्त्वाचे

बेड चिखलात किंवा उन्हात ठेवू नका. सावलीत आणि पाण्याचा निचरा होणारी जागा निवडणे गरजेचे आहे.

Vermicompost Mistakes | Agrowon

पाण्याचे योग्य व्यवस्थापन

जास्त पाणी दिल्यास गांडूळ गुदमरतात. पाणी कमी पडल्यास ती सुकतात, त्यामुळे वाफसा स्थिती ठेवा.

Vermicompost Mistakes | Agrowon

टाकी आणि स्वच्छता

सिमेंट टाकी पूर्ण बंद ठेवू नका, हवा खेळती राहू द्या. बेडभोवती स्वच्छता ठेवा, त्यामुळे मुंग्या व उंदीर टाळता येतात.

Vermicompost Mistakes | Agrowon

योग्य प्रमाण आणि अन्न

एका बेडसाठी १ ते २ किलो गांडूळ वापरा. बिनकुजलेले पूर्ण कुजलेले पदार्थ टाळून अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ वापरणे सर्वात योग्य ठरते.

Vermicompost Mistakes | Agrowon

शेण आणि चुकीचे पदार्थ टाळा

ताजं शेण वापरू नका, ते गरम असते आणि गांडूळ मरतात. लिंबूवर्गीय, कांदा, लसूण, प्लास्टिक असे पदार्थ टाकणे टाळा.

Vermicompost Mistakes | Agrowon

खत काढताना नियोजन

खत काढताना बाजूला दोन बेड तयार ठेवा. यामुळे गांडूळ पुन्हा वापरता येतात आणि उत्पादन सुरू राहते.

Vermicompost Mistakes | Agrowon

Mango Crop Care: अवकाळी पाऊस आणि गारपिटीत आंबा बाग वाचवण्यासाठी ८ सोपे उपाय

अधिक माहितीसाठी...