Mango Crop Care: अवकाळी पाऊस आणि गारपिटीत आंबा बाग वाचवण्यासाठी ८ सोपे उपाय

Swarali Pawar

आंबा बागेवर संकट!

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा पिकाला मोठा धोका निर्माण होतो. योग्य वेळी काळजी घेतली तर फळांचे नुकसान कमी करता येते.

Mango Rain Care | Agrowon

फळगळ टाळण्यासाठी..

गारपिटीमुळे पडलेली आणि खराब फळे लगेच गोळा करून नष्ट करा. यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Mango Rain Care | Agrowon

वेळेवर काढणी करा

वादळी पाऊस येण्याची शक्यता असल्यास परिपक्व फळे लवकर काढा. काढलेली फळे सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवा.

Mango Rain Care | Agrowon

गारपिटीपासून संरक्षण

आंबा फळांना फोमचे फ्रुटकव्हर लावल्यास थेट मार बसत नाही. यामुळे फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.

Mango Rain Care | Agrowon

करपा रोगापासून बचाव

ढगाळ आणि दमट हवामानात करपा रोगाचा धोका वाढतो. लक्षणे दिसल्यास योग्य प्रमाणात कार्बन्डाझिम अधिक मँकोझेब फवारणी करावी.

Mango Rain Care | Agrowon

फळ तडकणे कमी करा

फळे तडकू नयेत म्हणून बोरॅक्सची फवारणी उपयोगी ठरते. यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते आणि बाजारभाव चांगला मिळतो.

Mango Rain Care | Agrowon

फळमाशी नियंत्रण

गळलेली फळे लगेच नष्ट करा आणि सापळे लावा. यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो.

Mango Rain Care | Agrowon

काढणीनंतरची काळजी

फळे ५२°C पाण्यात १० मिनिटे बुडवून साठवण करा. यामुळे फळकूज टाळता येते आणि फळे जास्त दिवस टिकतात.

Mango Rain Care | Agrowon

Dengue in Cattle: उन्हाळ्यात जनावरांमध्ये डेंगूचा वाढता धोका! काय आहेत लक्षणे?

अधिक माहितीसाठी...