Organic Carbon : सेंद्रिय कर्ब वाढीसाठी कोणते उपाय करायचे?

Radhika Mhetre

नांगरट

जमिनीची कमीत कमी नांगरट करावी. जमिनीची धूप बांधबंदिस्ती द्वारे कमी करावी.

Organic Farming | Agrowon

पिकांच्या अवशेषाचा वापर

पिकांच्या अवशेषाचा आच्छादन म्हणून वापर करावा. यामध्ये खोडवा उसात पाचटाचे नियोजन, अवर्षण प्रवण भागात ज्वारी पिकात तुरकाठ्या, बाजरी सरमाडाचे आच्छादन यासारख्या उपायांचा समावेश होतो. 

Organic Carbon | Agrowon

सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर

जमिनीची पूर्वमशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशी प्रमाणे सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करावा.

हिरवळीची खते

जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा प्रमाण वाढविण्यासाठी कमीत कमी कमी तीन वर्षातून एकदा ताग, धैंचा यासारखी पिके घेऊन पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.

जिवाणू संवर्धकाचा वापर

अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकाचा वापर बीजप्रक्रिया तसचं शेणखतात मिसळून करावा.

पिकांची फेरपालट

पिकांच्या फेरपालटीत कडधान्यवर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करताना खतांची मात्रा संतुलित, योग्य वेळी, योग्य प्रकारे द्यावी.