Mahesh Gaikwad
शेळीपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते. ग्रामीण भागात घरामध्ये पिण्यासाठी शेळीचे दूध वापरतात.
शेळीच्या दुधातील विविध पोषणतत्त्व आणि औषधी गुणधर्म असल्याने ते आरोग्यवर्धक असते. त्यामुळे गायी-म्हशीच्या तुलनेत शेळीचे दूध मानवी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.
शेळीचे दूध हे नैसर्गिकरीत्या एकजीव झालेले असते. दुधातील स्निग्ध पदार्थ आकाराने सूक्ष्म असून पचनाला अत्यंत हलके असतात.
शेळीच्या दुधात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. ही खनिजे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.
शेळीच्या दुधातील पोटॅशिअम रक्तदाब तर मॅग्नेशिअम हे खनिज हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे.
शेळीच्या दुधातील कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे घटक नवजात शिशूंच्या शरीरात सहजरीत्या शोषली जातात. त्यामुळे लहान मुलांच्या सामान्य वाढीस यांची मदत होते.
शेळीचे दूध पोटातील जखमांवर उपचारासाठी अत्यंत गुणकारी आहे. दुधाच्या नियमित सेवनाने आतड्यांवरील सूज कमी होते. तसेच पोटाच्या इतर आजारांसाठी दूध फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार क्षयरोग, खोकला आणि काही स्त्रीरोगविषयक विकारांसाठी शेळीचे दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.