Mahesh Gaikwad
रेशीम धाग्यांपासून तयार केलेले कपडे सर्वांनाच आवडतात. रेशीम किड्यांपासून रेशीम कापड तयार होते.
रेशीम हे अतिशय मौल्यवान असून त्यापासून अनेक प्रकारचे किमती कपडे बनवले जातात.
रेशीम कीड्यांच्या लाळेपासून रेशीम तयार केले जाते. या कीड्यांना तुतीच्या पानांमध्ये पाळले जाते.
हे कीडे त्यांच्या लाळेपासून कोष तयार करतात. या कोषालाच रेशीम कोकून (कोष) असेही म्हणातात. या कोषांपासूनच रेशीम धागा तयार होतो.
रेशमाचे कोषांना विशिष्ठ तापमानाला पाण्यात उकळले जातात. अतितापमानामुळे कोष खराब होवू शकतात.
कोष उकळल्यानंतर ते वाळविले जातात आणि त्यांनंतर स्पिनिंग प्रोसेससाठी टाकले जाते.
स्पिनिंग मशिनमध्ये टाकल्यानंतर रेशीम कोषापासून धागा तयार होऊ लागतो. याच धाग्यांपासून रेशीम कापड तयार केले जाते.