Team Agrowon
सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे.
सध्या बाजारातील जास्त आवक, मोहरी उत्पादनात वाढीचा अंदाज आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे कमी झालेले भाव याचा दबाव देशातील सोयाबीन दरावर आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात निराशेचे वातावरण असल्याने भावावरील दबाव कायम आहे.
देशातील बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
तर देशातील बाजारात आवेकचा दबाव आणि मोहरी उत्पादनाची स्थिती स्पष्ट होईपर्यंत दरपातळीवर दबावच राहू शकतो.
असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.