Papaya Rate: खानदेशात पपईला काय दर मिळतोय?

Team Agrowon

खानदेशात सर्वाधिक साडेपाच हजार हेक्टरवर पपई लागवड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात रोगराई व मध्यंतरी घसरलेल्या दरामुळे पपईचे पीक शेतकऱ्यांनी काढले.

Papaya milk | Agrowon

पपईखालील मोठे क्षेत्र डिसेंबर व जानेवारीत रिकामे झाले. डिसेंबर, जानेवारीत पपईची मागणी नव्हती.

Papaya milk | Agrowon

या दोन्ही महिन्यांत पपईला सरासरी कमी दर मिळाला. डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना जागेवर सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.

Papaya Benefits | agrowon

तर जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी अडीच रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला आणि दुसऱ्या पंधरवड्यात सरासरी साडेतीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.

Papaya Crop | Agrowon

जानेवारीच्या अखेरीस दरातील पडझड थांबली. या महिन्याच्या सुरवातीला दरात सुधारणा सुरू झाली.

Papaya Crop | Agrowon

मागील काही दिवसांत पपई दरात एक किलोमागे रोज २५ पैसे ते ५० पैसे सुधारणा झाली. जानेवारीच्या अखेरीस पपई दर पाच रुपये प्रतिकिलो होते. सध्या साडेनऊ रुपये प्रतिकिलोचा दर आहे.

Papaya Cultivation | Agrowon