Gold Silver Rate : सोन्या, चांदीच्या दरात घसरण आजचा दर काय?

sandeep Shirguppe

सोने चांदी दर

मागच्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याने दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

Gold Silver Rate | agrowon

मोठी घसरण

दरम्यान सोन्या चांदीचे दर रोज कमी जास्त होत आहेत पण मोठी घसरण होताना पहायला मिळत नव्हती.

Gold Silver Rate | agrowon

चांदी २ हजारांनी उतरली

आज १३ जून २०२४ रोजी चांदीच्या भावात २ हजार रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली. तसेच सोनेही ६०० रुपयांनी उतरले.

Gold Silver Rate | agrowon

एमसीएक्सवर दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदी १ हजार ९२१ रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन ८८ हजार ५२४ रुपये प्रति किलोवर आली.

Gold Silver Rate | agrowon

सोने ६०० रुपयांनी स्वस्त

एमसीएक्सवर सोने कालच्या तुलनेत ५८२ रुपयांनी स्वस्त होऊन ७१ हजार ३८८ रुपयांवर आले.

Gold Silver Rate | agrowon

परदेशी बाजारातही सोने-चांदी स्वस्त

देशांतर्गत बाजाराबरोबरच परदेशी बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

Gold Silver Rate | agrowon

अमेरिकन अहवाल

अमेरिकेत फेडरल रिझर्व्हचा अहवाल सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत.

Gold Silver Rate | agrowon

मुंबईतील दर

मुंबईत २४ कॅरेट सोने ७१ हजार १६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९० हजार ७०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Gold Silver Rate | agrowon