Team Agrowon
सोने दरात या आठवड्यात तेजी आली आहे. दर एकाच दिवसात एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ८५० रुपयांनी वधारले असून, जळगावातील सुवर्ण बाजारात आता दर प्रतितोळा ६४ हजार ६५० रुपये झाला आहे.
सोने दर आखातातील युद्धानंतर वधारले. मध्यंतरी दरात किंचित घटही झाली. सलग ४० दिवस सोने दर कमी झाले.
दर ६३ हजार रुपये प्रतितोळावर पोहोचले होते. मध्यंतरी दर ६३ हजार २०० रुपये प्रतितोळा असे होते. परंतु त्यात घसरणही मागील महिन्यात झाली. फेब्रुवारीत कुठलीही वाढ सोने दरात दिसली नाही.
मार्चच्या सुरुवातीलाच मात्र दरात तेजी आली आहे. मंगळवारी (ता. ५) सोने दर एक तोळ्यामागे ८५० रुपयांनी वधारले व ६४ हजार ६५० रुपये प्रतितोळा झाले.
सध्या सोने दर उच्चांकी स्थितीत पोहोचले आहेत. दराने ६४ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सोने दरात मागील शनिवारी (ता. २) वाढीचा कल सुरू झाला. त्यात मंगळवारपर्यंत वाढ सुरूच राहिली. पुढेही वाढ होईल, असे संकेत आहेत.