Team Agrowon
व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यानंतर १ ते २ रुपये कमी; मात्र जागेवर खरेदी व तत्काळ पैसा या पद्धतीने शेतकरी द्राक्षाच्या ‘पेड कटिंग’ला प्राधान्य देत आहेत.
द्राक्षाच्या पेड कटींग पद्धतीमध्ये शिवारखरेदी पद्धतीने व्यापारी स्वतः द्राक्षाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करून दर ठरवतात.
दर ठरवल्यानंतर उपलब्ध मनुष्यबळामार्फत द्राक्ष काढणी होते.
काढणीपश्चात मालाची हाताळणी व प्रतवारी करून थेट जागेवरच पॅकिंग करून विविध बाजारपेठांमध्ये ही द्राक्षे जातात.
काढणी झाल्यानंतर बागेत मणी उरत नसल्याने बेदाणा उत्पादकांना द्राक्ष मण्यांच्या उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर काही ठिकाणी जावे लागले. त्यामुळे द्राक्ष मण्याला २० रुपयांवर दर मिळतो.
द्राक्ष खुडणी दोन ते तीन दिवसांत व्यापाऱ्यांकडून पूर्ण होत असल्यामुळे व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यानंतर १ ते २ रुपये कमी; मात्र जागेवर खरेदी व तत्काळ पैसा मिळतो.
Grape Ped Cutting Methodद्राक्षाची उपलब्धता कमी असल्याने अनेक व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडे चकरा माराव्या लागल्या यंदा मागणी वाढल्याने एप्रिलच्या मध्यातच हंगामाची सांगता होण्याची चिन्हे आहेत.