FASTag Rule : 'एक वाहन एक फास्टॅग' काय आहे नवा नियम, असा होईल फायदा

sandeep Shirguppe

'एक वाहन एक फास्टॅग'

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI चा 'एक वाहन एक फास्टॅग' नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला.

FASTag Rule | agrowon

नवीन नियम लागू

मार्च महिन्यात हा नियम लागू करण्यात येणार होता, केंद्राने एक महिन्याची मुदत देत ३१ मार्चपर्यंत वाढवली होती.

FASTag Rule | agrowon

इतर फास्टॅग बंद

या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत.

FASTag Rule | agrowon

त्रास होणार कमी

ज्या लोकांकडे एका वाहनाशी लिंक असलेले एकाहून अधिक फास्टॅग आहेत, त्यांचे एक सोडून इतर फास्टॅग १ एप्रिलपासून बंद होतील.१५ मार्चपर्यंतची मुदत

FASTag Rule | agrowon

१५ मार्चपर्यंतची मुदत

आपले इतर फास्टॅग बंद करण्यासाठी व त्यातील बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी RBI आणि PPBL ने ग्राहकांना १५ मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

FASTag Rule | agrowon

कशामुळे लागू झाला नियम?

इलेक्ट्रिक टोल प्रणालीची कार्यक्षमता अधिक सुधारावी आणि टोल प्लाझावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

FASTag Rule | agrowon

देशात ८ कोटी फास्टॅग यूजर्स

भारतातील सुमारे ९८ टक्के वाहनांना फास्टॅग लिंक होऊ शकतं. सध्या देशात ८ कोटींपेक्षा अधिक फास्टॅग यूजर्स आहेत.

FASTag Rule | agrowon

RFID टेक्नॉलॉजी

RFID टेक्नॉलॉजीनुसार वाहन टोल नाक्यावर जाताच फास्टॅग स्कॅन होऊन, टोलची किंमत कापली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो.

FASTag Rule | agrowon