Mahesh Gaikwad
भारतीय मसाल्यांमध्ये मिरचीचे विशेष महत्त्व आहे. भारतीय मसाल्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
जगात भारतीयांना तिखट आणि चटपटीत जेवणाचे शौकीन म्हटले जाते. झणझणीत जेवणासाठी मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
भारतीय लोकांना तिखट जेवण आवडत असले तरी अनेकांना भारतातील सर्वात तिखट मिरची कोणती हे माहित नाही. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
अमेरिकेतील कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून प्रसिध्द आहे. तर भारतातील भूत जोलोकिया ही भारतातील सर्वात तिखट मिरची आहे.
ही मिरची एवढी तिखट आहे की, तोंडात ठेवताच तुमच्या कानातून जाळ निघाल्यासारखे वाटेल. इतकी ही मिरची तिखट आहे.
ही मिरची जिभेवर ठेवताच डोळ्यांमध्ये तीव्र जळजळ सुरू होते. सामान्या मिरचीच्या तुलनेत भूत जोलोकिया मिरचीमध्ये ४०० पट अधिक तिखटपणा असतो.
भारतामध्ये प्रामुख्याने नागलँड आणि मणिपूरमध्ये या मिरचीचे उत्पादन घेतले जाते.