Team Agrowon
वाढत्या उन्हाचा फटका सर्वच पिकांना बसतोय. तसा तो उसालाही बसतोय. मार्च ते जून या काळात उसाला पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ताण बसतो, यामुळे उसाची वाढ आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
उसाच्या मुळाभोवतीचं तापमान वाढल्यामुळे मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाशसंश्लेषण मंदावते.
उसाच्या पानातून पाण्याच बाष्पीभवन वाढत. पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन पानातील हरितद्रव्याच प्रमाणही घटत.
तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात धशीचे प्रमाण वाढते.
पूर्वहंगामी आणि आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते आणि उसाच वजन घटत जातं.
सुरू हंगामात लागण केलेल्या तसच खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपा च्या उसाच्या संख्येत घट झाल्याने उत्पादन कमी येते.
जोरदार आणि कोरड्या हवेमुळे जमीन तसच उसातील ओलाव्यात झपाट्याने घट होत आहे.