Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याची योग्य पद्धत कोणती?

Swarali Pawar

ड्रॅगन फ्रुटची मागणी

आरोग्यासाठी फायदेशीर आणि परदेशी बाजारात मागणी जास्त असल्याने ड्रॅगन फ्रुटला चांगला दर मिळतो.

Demand for Dragon Fruit | Agrowon

ड्रॅगन फ्रुटचे प्रकार

पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल, पांढरा गर व पिवळी साल असे या फळाचे तीन प्रकार आहेत

Types of Dragon Fruit | Agrowon

योग्य जमीन आणि हवामान

मुरमाड किंवा हलकी जमीन योग्य ठरते. ५.५–६.५ pH असलेली जमीन आणि मध्यम पावसाचे कोरडे हवामान या पिकासाठी फायदेशीर आहे.

Soil and Climate | Agrowon

लागवड तंत्र

३.५ × ३.० मीटर अंतरावर लागवड केल्यास एका एकरात साधारण ३८० झाडे बसतात. वेलींसाठी मजबूत सिमेंट खांब उभे करावे लागतात.

Plantation Techniques | Agrowon

खत व्यवस्थापन

लागवडीवेळी शेणखत व रासायनिक खते द्यावीत. वेलींच्या वयानुसार युरिया, सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश योग्य प्रमाणात द्यावे.

Fertilizer Management | Agrowon

उत्पादन क्षमता

लागवडीनंतर १८–२४ महिन्यांनी फळधारणा सुरू होते. पहिल्या वर्षी १०–१२ किलो, तर तिसऱ्या वर्षी २०–२५ किलो फळे प्रती खांब मिळतात.

Dragon Fruit Production | Agrowon

कीड व रोग

मुळकुज व खवले किडीचा धोका असतो. मुख्य रोग म्हणजे स्टेम कॅन्कर ज्यामुळे ४०–५०% उत्पादन कमी होऊ शकते.

Pest and Disease Control | Agrowon

रोग नियंत्रण

शिफारस केलेल्या अंतरावर लागवड, स्वच्छता, छाटणी आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास पिकाचे संरक्षण करता येते.

Disease Management | Agrowon

Soybean Care: सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी कापणीपासून साठवणीपर्यंत घ्या ही काळजी

Soybean Seed Care | Agrowon
अधिक माहितीसाठी...