Swarali Pawar
सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागली व शेंगांचा रंग भुरकट/काळपट झाला की पीक कापणीला तयार होते.
८०-८५% शेंगा वाळल्यावर कापणी करावी. त्या वेळी दाण्यात साधारण १५-१७% ओलावा असतो.
पावसाळी किंवा दमट हवामानात कापणी करू नये. अशावेळी गंजी ताडपत्रीने झाकून ठेवावी.
ओल्या किंवा हिरव्या झाडांची गंजी लावू नये. दुपारच्या उन्हात गंजी फोडून दाणे सुकू द्यावेत.
मळणीपूर्वी दाण्यातील ओलावा १२-१३% असावा. यंत्राचा वेग नियंत्रित ठेवा म्हणजे बियाणे फुटणार नाहीत.
बियाणे जास्त गरम करू नयेत. ओलसर बियाणे उन्हात पण सावलीत वाळवावेत. ताडपत्रीचा वापर करावा.
साठवण्याआधी काडी, कचरा, फुटलेले व अपरिपक्व बियाणे वेगळे करावेत. प्रतवारी मशीनचा वापर करावा.
बियाणे पोत्यात भरून लाकडी फळ्यांवर ठेवावेत. थप्पी ५ फुटांपेक्षा जास्त नसावी. साठवलेली जागा कोरडी, थंड व स्वच्छ असावी. दर १५ दिवसांनी तपासणी करावी.