Weed Control: तणनाशकांचा खर्च कमी करण्याचा सोपा उपाय

Swarali Pawar

तणमुक्त शेतीचा फॉर्म्युला!

तणांमुळे पिकाचे अन्न, पाणी आणि ओलावा वाया जातो. यावर स्टेल सीडबेड तंत्र हा कमी खर्चात प्रभावी उपाय ठरू शकतो.

Pre Sowing Weed Control | Agrowon

स्टेल सीडबेड म्हणजे नेमकं काय?

मुख्य पिकाची पेरणी करण्यापूर्वी तणांची बियाणे उगवून ती नष्ट करण्याची पद्धत म्हणजे स्टेल सीडबेड. यामुळे सुरुवातीपासूनच तणांचे प्रमाण कमी राहते.

Pre Sowing Weed Control | Agrowon

सुरुवात कशी कराल?

पेरणीच्या १५ ते २० दिवस आधी शेताची मशागत करून जमीन भुसभुशीत करा. त्यानंतर हलके पाणी द्या किंवा पावसाचा ओलावा तयार होऊ द्या.

Pre Sowing Weed Control | Agrowon

तण उगवू द्या, मग नष्ट करा!

ओलावा मिळाल्यानंतर सुप्त अवस्थेतील तणांची बियाणे उगवतात. तणे ३ ते ४ पानांच्या अवस्थेत आल्यावर ती नष्ट करावीत.

Pre Sowing Weed Control | Agrowon

तण नियंत्रणाचा खर्च कमी

या तंत्रामुळे तणनाशके आणि मजुरीवरील खर्च कमी होतो. त्यामुळे शेतीचा खर्च आटोक्यात ठेवणे सोपे जाते.

Pre Sowing Weed Control | Agrowon

पिकाला मिळतो जास्त फायदा

तणांची स्पर्धा कमी झाल्यामुळे पिकाला अधिक ओलावा आणि अन्नद्रव्ये मिळतात. त्यामुळे सुरुवातीपासून पिकाची वाढ जोमदार होते.

Pre Sowing Weed Control | Agrowon

कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?

सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या खरीप पिकांमध्ये हे तंत्र विशेष फायदेशीर ठरते. कमी पावसाच्या परिस्थितीतही याचा चांगला उपयोग होतो.

Pre Sowing Weed Control | Agrowon

ही चूक करू नका!

तण नष्ट करताना खोल मशागत टाळा. उथळी मशागत केल्यास ओलावा टिकून राहतो आणि नवीन तणांची बियाणे वर येत नाहीत.

Pre Sowing Weed Control | Agrowon

Tur Crop Advisory: तूर लागवडीत भरघोस उत्पादन हवंय? या ८ गोष्टी लक्षात ठेवा!

Agrowon
अधिक माहितीसाठी...