Swarali Pawar
एल निनो किंवा कमी पावसाच्या परिस्थितीतही तूर चांगले उत्पादन देऊ शकते. फक्त योग्य वाण, वेळेवर पेरणी आणि सुधारित लागवड तंत्राचा वापर करा.
मध्यम ते भारी, भुसभुशीत आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडा. पाणथळ आणि चोपण जमीन तुरीसाठी टाळावी.
२ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी १० ते १२ गाड्या कुजलेले शेणखत मिसळावे.
७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. १५ जून ते १५ जुलै हा कालावधी सर्वाधिक योग्य मानला जातो.
कमी कालावधीच्या वाणांसाठी ६० × २० सेंमी अंतर ठेवावे. मध्यम कालावधीच्या वाणांसाठी ९० ते १२० × २० ते ३० सेंमी अंतर योग्य आहे.
तूर आंतरपीक म्हणून घेताना १८० × २० ते ३० सेंमी अंतर ठेवावे. यामुळे जोखीम कमी होऊन उत्पन्नाचे स्रोत वाढतात.
हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश द्यावे. पेरणीच्या वेळीच शिफारशीनुसार खते द्यावीत.
गरजेनुसार २० ते २५ किलो गंधक आणि १५ किलो झिंक सल्फेट द्यावे. संतुलित खत व्यवस्थापनामुळे उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते.