Team Agrowon
वासरांचे कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्याप्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर केला जातो.
दुधाऐवजी, दूध भुकटी आणि इतर घटक मिळून दुधाच्या दर्जाचे आणि तितकेच पचनीय मिश्रण तयार करून वासरांसाठी वापरता येते,याला मिल्क रिप्लेसर म्हणतात.
मिल्क रिप्लेसर हे प्रामुख्याने स्कीम मिल्क पावडर, व्हे प्रोटीन, वनस्पतिजन्य प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार खनिजे, ॲन्टिऑक्सिडंट्स यापासून बनवलेले असते.
मिल्क रिप्लेसर पावडरमध्ये सर्वसाधारपणे २० ते २८ टक्के प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे १८ ते २२ टक्के इतके असते.
मिल्क रिप्लेसर भुकटीच्या स्वरूपात असते. ज्यामध्ये पाणी मिसळून दुधाच्या दर्जाचे मिश्रण तयार करता येते. तयार झालेले मिश्रण हे संपूर्ण दुधाऐवजी किंवा काही प्रमाणात दूध कमी करून त्याऐवजी वापरता येते.
विविध सहकारी दूध संघ तसेच स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मिल्क रिप्लेसर बाजारात उपलब्ध आहे.
गाई, म्हशींच्या दुधातील घटकांचे प्रमाण हे दूध देणाच्या काळानुसार बदलत असते. परंतु मिल्क रिप्लेसरमधील पोषणतत्त्वाचे प्रमाण हे एकसारखे असते. त्यामुळे उत्तमवाढीसाठी मिल्क रिप्लेसर पोषक ठरते.