Team Agrowon
तुरीच्या भावातील नरमाई सुरुच आहे.
तुरीच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं जवळपास एक हजार रुपयांची नरमाई आली.
याचे मुख्य कारण आहे नव्या मालाची आवक. देशातील अनेक बाजारात नवी तूर दाखल होत आहे.
पुढील काळात आवक वाढेल. तसेच सरकारच्या धोरणांचाही दबाव आहे. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय.
आवक वाढल्यानंतर बाजारावरील दबाव वाढू शकतो. पण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच आयात वाढीला मर्यादा आहेत.
त्यामुळे आवक घटल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.