Team Agrowon
एकिकडे कांद्याचे भावात घसरण सुरू असताना गहूनं मात्र शेतकऱ्यांना आधार दिला आहे.
पुण्यातील दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक घटल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे.
बाजार समितीत गव्हाची ७४२ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २२०० तर कमाल ३३५१ रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
अन्नधान्याबरोबरच भाजीपाल्याच्या आवकेमध्ये काकडीची ४४ क्विंटल आवक झाली असून प्रति दहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ४०० रुपये असा दर मिळाला.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने दौंड तालुक्यात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल सातशे रुपयांची घट झाली आहे.
तर दौंड बाजार समितीत ज्वारी-६०००, बाजरी - ३२०१, हरभरा - ५५५, मूग - ९००० आणि मका - २३१० अशा कमाल रूपयानी प्रतिक्विंटल दराने जात आहे.