Team Agrowon
मक्याचे भाव मागील चार दिवसांपासून स्थिरावले आहेत. मक्याचे उत्पादन कमी झाल्याने आवक सराससरीपेक्षा कमीच होत आहे.
सध्या मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
यंदा दुष्काळी स्थितीचा फटका इतर पिकांप्रमाणे मका पिकालाही बसत आहे.
रब्बीतील पीकही दुष्काळाच्या तडाख्यात सापडू शकते. त्यामुळे रब्बीतील उत्पादनाविषयी चिंता कायम आहे.
तसेच मक्याला सध्या मागणी चांगली येत आहे. पण इतर धान्य पिकांच्या दरानुसार आणि पशुखाद्याच्या मागणीनुसार मक्याचे भाव बदलू शकतात.
बाजारातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर मक्याचा बाजारही सुधरू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.