Team Agrowon
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे २२ जिल्ह्यांमध्ये साडे चार लाख हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आंलेली पिके वाया गेली आहेत. तसेच शेतातील शेडनेट मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पशुधनाची हानी झाली आहे, त्यांना मदत करण्यासाठी कोणत्याही विम्याची तरतूद नाही.
त्यामुळे शासनाने शेडनेट व पशुधन नुकसानीसाठी विम्याची तरतूद करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला भाव, दुष्काळग्रस्तांना मदत, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आदी प्रश्नांवर महाविकास आघाडीच्यावतीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.