Mahesh Gaikwad
यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होणे यालाच फॅटी लिव्हर असे म्हटले जाते. यामुळे यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
सुरूवातीला फॅटी लिव्हरचा त्रास जाणवत नाही. बहुतेक वेळा विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचणीतून याचे निदान होते.
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे फॅटी लिव्हरची समस्या वाढते.
फॅटी लिव्हरची समस्या सामान्यत: दारूचे अतिसेवन करणाऱ्यांमध्ये दिसून येते. थकवा, पोटदुखी, अशक्तपणा ही याची काही प्राथमिक लक्षणे आहेत.
जास्त विश्रांतीनंतरही थकवा जाणवणे, पोटाच्या उजव्या बाजूला वरील भागात वेदना ही याची लक्षणे आहेत.
डोळे, त्वचा पिवळी पडणे हे फॅटी लिव्हरच्या लक्षणांपैकी एक आहे. फॅटी लिव्हरमध्ये चयापचयाची क्रिया प्रभावित होते. ज्यामुळे वजन वाढते.
जर यकृताचे योग्यरित्या कार्य करत नसेल, तर त्याचा मेंदूवरही परिणाम जाणवतो, जसे की एकाग्रता कमी होते.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी जंक फूड, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे. लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.