sandeep Shirguppe
खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हटलं की, त्यांना एक्सपायरी डेट ही आलीच. परंतु याकडे आपलं नकळत दुर्लक्ष होते.
एक्सपायरी डेट संपताच त्यामध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात.
एक्सपायरी डेट झालेल्या पदार्थांमुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि ताप या समस्या उद्भवू शकतात.
तारीख संपलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर पोटात गॅस, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
असे पदार्थ खाल्ल्याने काही ऍलर्जीक घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरात ऍलर्जीची होण्याची शक्यता असते.
अन्नपदार्थ खरेदी करता त्यावेळी त्याची एक्सपायरी डेट तपासा. त्यावर लिहलेल्या दिवसांच्या आत पदार्थ संपवा.
अन्नपदार्थ योग्य तापमानात आणि योग्य प्रकारे ठेवले पाहिजेत. जेणेकरून ते पदार्थ खराब होणार नाहीत.
वरील माहिती फक्त सामान्य आहे, कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.