sandeep Shirguppe
काळया मिरीमध्ये पायपॅरीन नावाचा घटक असतो. आणि पायपॅरीनमध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
डेंग्यू तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डासावर काळ्या मिरीचा मारक परिणाम होतो.
काळे मिरेची पावडर कर्करोग आणि पित्तविरोधी आहे.
पित्तामुळे पोटात गुडगुड किंवा भगभग होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.
मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूकही वाढते.
काळे मिरे आणि वेलदोडा (विलायची) समप्रमाणात घेऊन भुकटी करुन ती घेतल्यावर हगवणीवर गुणकारी ठरते.
काळ्या मिरीवर संशोधन करण्यात येत आहे. पायपॅरीनवर कॅन्सर प्रतिबंधक औषध म्हणून संशोधन करण्यात येत आहे.
पायपॅरीन हे शरीरातल्या काही कर्करोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंचा नायनाट करु शकते.