sandeep Shirguppe
आपले शरीर डिटॉक्सचे जसे आरोग्याला फायदे आहेत तसं, मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज असते.
सध्या सतत स्क्रिनवर काम केल्याने किंवा मोबाईलचा जास्त वापर केल्याने मानसिक आरोग्यावर ही परिणाम होतो.
आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या डिजिटल गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. हे डिजिटल डिटॉक्स नेमके काय आहे?
डिजिटील डिटॉक्स म्हणजे सोशल मीडियाच्या सर्व साधनांपासून पूर्णपणे दूर राहणे. यात दोन दिवस, १ आठवडा, १ महिना असा कालावधी असतो.
तसेच, या कालावधीमध्ये तुम्हाला आभासी जगापासून अंतर राखायचे आहे. यामुळे, तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते.
विनाकारण मोबाईलचा वापर टाळणे, अतिषय महत्वाच संदेश असेल तरच फोनचा वापर करणे, मोबाईलचा वापर टाळणे.
डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही मोबाईल बंद करून मित्र मैत्रीणी किंवा पालकांशी संवाद करा किंवा वेळ घालवा.
कोणतेही काम नसताना तुम्हाला लगेच फोन उचलण्याची सवय असेल तर, तुम्ही नॉन-डिजिटल राहण्याची सवय लावणे, अत्यंत आवश्यक आहे.
नॉन-डिजिटल रहायचे म्हणजे काय करायचे तर, तुमच्या छंदांवर लक्ष केंद्रित करायचे. जसे की, मोबाईलऐवजी पुस्तक वाचणे यासारख्या गोष्टी.