sandeep Shirguppe
सोयाबीनपासून तयार करण्यात आलेलं सोया दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
म्हैस आणि गायीच्या दूधाप्रमाणेच सोया मिल्कमध्ये देखील अनेक पोषक गुणधर्म आहेत.
अनेक विटामिन्स, खनिजं, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेलं सोया मिल्क हे एक शुद्ध शाकाहारी दूध मानलं जातं.
व्हिटॅमिन बी12, प्रोटीन, सोडियम, फाइबर, पोटॅशियम, फॅटी एसिड, फॉस्फोरस, आयरन आणि मिनरल्स उपलब्ध असतात.
वजन कमी करण्यासाठी सोया मिल्कचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.
रोज एक कप सोया मिल्क घेतल्यास ऑस्टियोपोरोसिस आणि आर्थराइटिस सारख्या समस्यांपासून बचाव करणं शक्य आहे.
हृदय निरोगी राहण्यासाठी सोया मिल्कचं सेवन फायदेशीर ठरतं. आयुर्वेदातही सोया मिल्कला अत्यंत पोषक दूध मानण्यात आलं आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोय मिल्कचं सेवन करावं. यातील अँटीऑक्सिडंट इम्यूनिट बूस्ट वाढण्यास मदत करतात.