sandeep Shirguppe
सध्या स्पर्धात्मकता उद्दिष्ट गाठणं यासाठी माणसं अविरतपण, अफाट वेगानं धावतात. यातून वारंवार तणावपूर्ण स्थिती निर्माण होते.
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सायक्लिक मेडिटेशन करणे महत्वाचे मानले जाते.
सायक्लिक मेडिटेशन करताना मन हे शरीरात निर्माण केलेल्या हळुवार हालचालीत रमतं आणि शांत होतं.
सायक्लिक ध्यानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा अनुकंपी आणि परानुकंपी मज्जासंस्थेच्या कार्यातला उत्तम ताळमेळ ठेवतो.
काही व्यक्तींना आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या असतात. गंभीर आजार असला तरी आपल्या मनाच्या शक्तीने आपण त्यावर मात करू शकतो.
मेडिटेशन केल्याने आपण बराचवेळ आपलं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत असतो.
मेडिटेशन केल्याने आपला आत्मविश्वास आहे त्याहून अधिक चांगला आणि स्ट्राँग होतो.
कामाचा जास्त ताण असेल तर सकाळी उठल्यावर १० ते १५ मिनिटे मेडिटेशन केले पाहिजे.
प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञाननिष्ठ संशोधनाची जोड देऊन बनलेली सर्वोत्कृष्ट ध्यानप्रक्रिया म्हणजे ‘सायक्लिक मेडिटेशन’