Fruit And Vegetable Canning : फळे, पालेभाज्यांचे कॅनिंग करणे म्हणजे काय?

Team Agrowon

फळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण केल्यानंतर हवाबंद डब्यात पॅकिंग करून ठेवणे या तंत्रास कॅनिंग असे म्हणतात.

Fruit And Vegetable Canning | Agrowon

या तंत्राद्वारे प्रक्रिया केलेल्या फळे व पालेभाज्या जास्त काळ साठविता येतात.

Fruit And Vegetable Canning | Agrowon

हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग केल्यानंतर ही उत्पादने नैसर्गिक तापमानास साठविता येतात, त्यासाठी विशिष्ट तापमान किंवा वातावरणाची विशेष आवश्‍यकता नसते.

Fruit And Vegetable Canning | Agrowon

या प्रक्रियेद्वारे तयार केलेली उत्पादने बारा महिन्यापर्यंत टिकून राहू शकतात.

Fruit And Vegetable Canning | Agrowon

कॅनिंग प्रक्रियेसाठी जास्त पक्व आणि वाढ झालेल्या कच्च्या शेतीमालाची निवड करू नये.

Fruit And Vegetable Canning | Agrowon

या उत्पादनात असलेल्या आम्लता आणि साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे कच्च्या मालाची वारंवार गुणवत्ता चाचणी करणे आवश्‍यक असते.

Fruit And Vegetable Canning | Agrowon

फळे द्राक्ष, अननस, आंबा, पेरू, केळी, पपई, स्ट्रॉबेरी,पीयर्स, मनुका, जरदाळू, इत्यादी भाजीपाला कोबी, गाजर, मशरूम, वाटाणे, बटाटे, भेंडी, टोमॅटो, पालक,शतावरी, बीन्स, इत्यादी

Fruit And Vegetable Canning | Agrowon

शेतीमाल गरजेनुसार प्रीकूलिंग चेंबर मधून बाहेर काढून कॉन्व्हेयर बेल्ट वर टाकला जातो. यामध्ये खराब तसेच निकृष्ट दर्जाचा, सडलेला व प्रक्रियेसाठी आवश्‍यक नसलेला माल काढून टाकला जातो.

Fruit And Vegetable Canning | Agrowon