sandeep Shirguppe
सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरीचे हब म्हणून ओळखला जातो. या भागातील स्ट्रॉबेरी जगप्रसिद्ध आहे.
वाई तालुक्याच्या फुलेनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत खामकर यांनी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड करत युवा शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा प्रगतिशील शेतकरी उमेश खामकर यांनी निवडला आहे.
फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे.
यानंतर याचे जगभरात विविध ठिकाणी उत्पादन घेण्यात आले. भारतात मात्र हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे.
रॉयल्टी राइट्स स्वत:कडे
खामकर यांनी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्यांनी विकत घेतले. त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल्यास खामकर यांची परवानगी लागेल.
नोव्हेंबर २०२३ मध्ये २० गुंठ्यांच्या क्षेत्रात खामकर यांनी दहा हजार रोपे लावली. यातून जानेवारीमध्ये उत्पन्नास सुरुवात झाली.
साताऱ्यासह अन्य ठिकाणीही त्यांनी फळे विक्रीला ठेवली. पांढरी स्ट्रॉबेरी सहापट उत्पन्न देत असल्याची त्यांनी माहिती दिली.
लाल स्ट्रॉबेरीला आंबटपणा असतो परंतु फ्लोरिडा पर्ल स्ट्रॉबेरी जात तुलनेत ही नैसर्गिकदृष्ट्या गोड स्ट्रॉबेरी आहे.