Biofortified Varieties : पिकाच्या बायो-फोर्टिफाइड जाती म्हणजे काय ?

Team Agrowon

नविन वाण विकसीत करण्याची गरज

बदलते वातावरण, कीड - रोगाचा प्रादुर्भाव तसच वाढती अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन विविध पिकांचे नविन वाण विकसीत करण्याची गरज निर्माण झाली.

Biofortified Varieties | Agrowon

बहुतेक पिकांच्या जाती पौष्टिक गुणवत्तेत कमकुवत

बहुतेक पिकांच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती पौष्टिक गुणवत्तेत कमकुवत आहेत किंवा त्यांची पौष्टिक स्थिती आवश्यक स्तरापेक्षा कमी आहे.

Biofortified Varieties | Agrowon

कुपोषण

संतुलित पोषण आहाराच्या सेवनामुळे कुपोषण ही एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे. कुपोषण दूर करण्यासाठी अन्नधान्याच्या  बायो-फोर्टिफाइड जाती तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि कमीत कमी खर्चिक मार्ग आहे. 

Biofortified Varieties | Agrowon

पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन जाती

धान्यपिकांमधील पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी नवीन जाती विकसित केल्या जात आहेत. अशा वाणांना बायोफॉर्टीफाईड म्हणजे जैवसंपृक्त वाण म्हटले जाते.

Biofortified Varieties | Agrowon

जैवसंपृक्त पिके हा उत्तम पर्याय

बाहेरून गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा नैसर्गिकरीत्या पोषकद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जैवसंपृक्त पिके हा उत्तम पर्याय ठरतात.      

Biofortified Varieties | Agrowon

गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बायो-फोर्टिफाइड जातींची निर्मिती

भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बायो-फोर्टिफाइड जातींची निर्मिती केली आहे. या जातींमध्ये अन्नघटकांचे चांगले प्रमाण आहे.

Biofortified Varieties | Agrowon

मानवी आहारात पोषक धान्याचा वापर

भाताच्या जातीही विकसीत झाल्याआहेत.  त्यामुळे मानवी आहारात पोषक धान्याचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

Biofortified Varieties | Agrowon