Team Agrowon
रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांने द्यावीत.
उभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वापसा असावा.
रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.
स्फुरदयुक्त खते मुळांच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. हेक्टरी २.५ लिटर द्रवरूप स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
पालाशयुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
लागवडीची खत मात्रा शेणखतात मिसळून द्यावी. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपयुक्तता वाढून ती पिकाला लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.
खत मात्रा ठिबक संचाद्वारे दिल्यास खतांची उपयुक्तता वाढते आणि खर्चात बचत होते.