Heat Wave Summer: उष्णतेची लाट म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि परिणाम

Swarali Pawar

एवढं तापतंय का?

सध्या वाढलेल्या तापमानामागे सुपर एल निनो हे मोठं कारण आहे. यामुळे उष्णतेच्या लाटा तयार होऊन शेती, जनावरं आणि माणसांवर परिणाम होतो.

El Nino Effect Agriculture | Agrowon

उष्णतेची लाट म्हणजे काय?

काही दिवस सतत नेहमीपेक्षा जास्त तापमान राहिलं तर ती उष्णतेची लाट असते. ही परिस्थिती पिकं, पाणी आणि आरोग्यावर परिणाम करते.

El Nino Effect Agriculture | Agrowon

सुपर एल निनो म्हणजे काय?

पॅसिफिक महासागरातील पाणी जास्त गरम झालं की एल निनो निर्माण होतो. यामुळे भारतात पाऊस कमी आणि तापमान जास्त होतं.

El Nino Effect Agriculture | Agrowon

प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे

भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. म्हणून तापमानानुसार उष्णतेची लाट ठरवली जाते.

El Nino Effect Agriculture | Agrowon

उष्णतेची लाट कधी म्हणतात?

मैदानी भागात ४०°C पेक्षा जास्त तापमान असेल तर लाट मानली जाते. तापमान ६.५°C ने वाढल्यास ती तीव्र उष्णतेची लाट ठरते.

El Nino Effect Agriculture | Agrowon

अत्यंत उष्णता कधी?

तापमान ४५°C पेक्षा जास्त असेल तर उष्णतेची लाट असते. ४७°C पेक्षा जास्त गेल्यास ती तीव्र उष्णतेची लाट म्हणतात.

El Nino Effect Agriculture | Agrowon

शेतीवर होणारा परिणाम

उष्णतेमुळे पिकांची वाढ कमी होते आणि उत्पादन घटते. म्हणून पिकांना गरजेनुसार पाणी आणि आच्छादन द्यावे.

El Nino Effect Agriculture | Agrowon

काळजी घ्या

गोठा, पाणी आणि आहार व्यवस्थापन योग्य ठेवा. उष्णतेपासून बचावासाठी वेळेवर उपाय करणं खूप गरजेचं आहे.

El Nino Effect Agriculture | Agrowon

Summer Calf Care: वासरांमध्ये वाढतोय उन्हाचा ताण! ‘या’ उपायांनी ठेवा त्यांना सुरक्षित

अधिक माहितीसाठी...